मोठी बातमी! उष्णते पासून दिलासा मिळणार.. पण वादळाचा तडाखा झेलायला तयार रहा! महाराष्ट्रातील "या" जिल्ह्यांना पुढील ४ दिवस अलर्ट..मान्सून केरळमध्ये पोहचला! बुलढाणा जिल्ह्यालाही...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण देशाच्या नजरा लागलेल्या नैऋत्य मान्सूनचे काल म्हणजेच गुरुवारी केरळमध्ये आगमन झाले. भारतीय हवामान खात्याने तशी अधिकृत घोषणा देखील केली आहे. केरळमध्ये पोहोचलेला मान्सून आता महाराष्ट्रात कधी दाखल होतो याकडे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ३ ते ४ दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा बसणार आहे. शिवाय मान्सून पुढील दोन ते तीन दिवसात गोवा आणि महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवामान विभागाने राज्यात पुढील तीन ते चार दिवस वादळी पावसाचा देखील इशारा दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पाऊस आणि गारपीट होत आहे. कोकणात देखील मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत..यामुळे उकाड्याने परेशान झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे..
गेल्या वर्षीचे गणित..
  गेल्या वर्षी २४ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर २५ मे रोजी महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर आणि २६ मे रोजी मुंबईत मान्सूनचे आगमन झाले होते. यंदा मात्र सरासरी वेळेपेक्षा सुमारे तीन दिवस उशिराने मान्सून केरळमध्ये पोहचला आहे.
बुलढाण्यात वादळी पाऊस?
दरम्यान हवामान विभागाने
 अमरावती वर्धा, चंद्रपूर, जिल्ह्यांसाठी आज ५ जुलैला ऑरेंज अलर्ट दिला आहे. शिवाय बुलढाणा, वाशिम ,अकोला, यवतमाळ,नागपूर, भंडारा ,गोंदिया, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली सातारा ,रत्नागिरी, रायगड, पुणे, नाशिक, बीड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज उद्या आणि परवा वादळी वारे, विजा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.. त्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.