BIG NEWS! राहुल गांधींचा राहुल बोंद्रेंना फोन! राहुल बोंद्रे ढसाढसा रडले..! पक्षप्रवेश सोहळ्याआधी मोठी घडामोड! उद्याचा भाजप प्रवेशाचा सोहळा रद्द?

 
 बुलडाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): राहुल बोंद्रे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच हा पक्षप्रवेश सोहळा आता रद्द झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत विश्वासनीय सूत्रांची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उद्या दुपारी साडेतीन वाजता मुंबईतील भाजप कार्यालयात राहुल बोंद्रे यांचा पक्षप्रवेश होणार होता. त्यासाठी राहुल बोंद्रे मुंबईला रवाना होणार होते. मात्र, आता हा पक्षप्रवेश सोहळा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा काही तास आधी राहुल बोंद्रे यांना फोन आला. तुमच्यावर दबाव येतोय, दबावाला बळी पडू नका,विरोधक संपवण्याचा हा प्रयत्न आहे असे राहुल गांधी राहुल बोंद्रे यांना सांगत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान राहुल बोंद्रे राहुल गांधी यांच्याशी बोलतांना ढसाढसा रडत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. मी सगळ काही गमावेल पण शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहीन असे राहुल बोंद्रे यांनी राहुल गांधी यांच्याशी बोलतांना म्हटल्याचे दिसत आहे. त्यामुळे राहुल बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाचा सोहळा रद्द केल्याची माहिती समोर येत आहे..

काँग्रेससोबतच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासानंतर राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, पक्षप्रवेशाच्या काही तास आधीच हा सोहळा रद्द झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राहुल बोंद्रे यांची पुढील राजकीय भूमिका काय असणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्या मुंबईत होणाऱ्या भाजप प्रवेशापूर्वीची ही घडामोड चिखलीच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.