मोठी बातमी! आमदार गायकवाड यांच्या राड्यानंतर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; आमदार निवासातील कॅन्टीन वाल्याला शिकवला धडा...

 
  आमदार गायकवाड यांच्या राड्या नंतर काल दिवसभर अन्न व औषध प्रशासनाने आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन ची तपासणी केली. अपेक्षित स्वच्छता व गुणवत्ता न आढळल्याने कॅन्टीनच्या ठेकेदाराचा परवाना रद्द केला आहे..
  का केला राडा? आ.गायकवाड म्हणाले...
 "मी आकाशवाणी आमदार निवासामध्ये रात्री नऊ वाजता वरण भात मागवला होता. पण त्याचा पहिला घास घेतला तेव्हा तो आंबट लागला. मला वाटलं लिंबू टाकलं असेल म्हणून तसे असेल.. पण दुसरा घास घेतल्यानंतर मला उलटी आली.. या कॅन्टीनमध्ये बरीच माणसं येत असतात.. जर आमदारालाच असे जीवन देत असतील तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल? त्यामुळेच मी त्यांना चोप दिला" अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आमदार गायकवाड यांनी दिली.