BIG BREKING रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन चिघळले! किनगाव जट्टू येथे शेतकरी आंदोलकांनी एसटी बस पेटवली...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कालपासून सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशी चिघळले आहे. शेतकरी आंदोलकांनी आत्ता थोड्या  वेळापूर्वी एसटी बस पेटवून दिल्याची माहिती समोर आली आहे. लोणार आगाराची एसटी बस किनगाव जट्टू  मुक्कामी गेली होती.त्यावेळी हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे...

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती व्हावी यासाठी रविकांत तुपकर काल,१५ जूनपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. या अन्नत्याग आंदोलनाकडे प्रशासनाच्या वतीने होणाऱ्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या भावना उफाळून आल्या आहेत. दिवसभरात ठिकठिकाणी आंदोलकांनी फसव्या कर्जमाफीचा  जीआर जाळला. काही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळल्याच्या घटना समोर आल्या. दरम्यान आत्ता १६ जूनच्या रात्री, साडेदहाच्या सुमारास थोड्या वेळापूर्वी किनगाव जट्टू येथे पेटवल्याची घटना समोर आली आहे. लोणार आगाराची ही बस किनगाव  जट्टू  येथे मुक्कामी गेली होती,त्यावेळी आंदोलकांनी ही बस पेटवून दिल्याचे समोर आले आहे..