BIG BREKING बुलढाणा जिल्हा पोलिस दलात खळबळ; जळगाव जामोदच्या राजुरा शिवारातील हत्याकांडात मोठा उलटफेर; जिच्या हत्येसाठी वडील आणि भावाला LCB ने केली होती अटक "ती" निघाली जिवंत;

म्हणे,माझ्या वडिलांना भावाला सोडा...LCB च्या तपासावर प्रश्नचिन्ह... एसपी तांबे म्हणाले,...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडवून देणारा घटनाक्रम समोर आलाय.. एखाद्या हॉरर हिंदी चित्रपटाची स्टोरी वाटावी असा हा घटनाक्रम आहे.. गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव जामोद तालुक्यातल्या राजुरा शिवारात धड नसलेले मुंडके सापडले होते, त्यानंतर धड सापडले.. पोलिसांच्या तपासात एका तरुणीचा हा मृतदेह असल्याचे समोर आले होते.. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसात बुलढाणा एलसीबीने नात्याने वडील आणि भाऊ असलेल्या दोघांना अटक करीत त्या दोघांनीच मुलीचा खून केल्याचा दावा केला होता. तशी प्रेस नोट देखील बुलढाणा पोलिसांनी प्रसिद्धीस दिली होती. लग्न झालेल्या विवाहित तरुणीचे चुलत भावाशी संबंध होते ,त्यातूनच वडील आणि भावांनी मुलीचा खून करीत तिचे शीर धडा वेगळे करीत मृतदेह जाळून  नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा बुलढाणा एलसीबीने केला होता.. मात्र आता यात धक्कादायक उलट फेर झाला आहे.. जिची हत्या झाल्याचा दावा बुलढाणा पोलिसांनी केला होता ती मुलगी चक्क जिवंत निघाली असून पोलिसांसमोर हजर झाली आहे... या घटनाक्रमामुळे बुलढाणा एलसीबी तपासावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.. पोलिसांसमोर हजर झालेल्या मुलीचे वडील आणि भाऊ सध्या तिच्याच हत्येच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत आहेत..
२६ एप्रिल रोजी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात अर्धवट झालेल्या अवस्थेत धड आणि शीर वेगवेगळे सापडले होते. एलसीबीने या प्रकरणाचा तपास करीत मृतक तरुणीची ओळख शिवानी कळमेकर अशी पटवत बऱ्हाणपूर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असल्याचे सांगितले होते. टीम एलसीबीने या हत्याकांडात शिवानीच्या वडील आणि भावाला अटक केली होती. विवाहित असलेल्या शिवानी चे तिच्या चुलत भावाशी प्रेम संबंध असल्याने संतापून वडील आणि भावाने तरुणीचा खून केल्याचा तपास (?) एलसीबी ने केला होता. अतिशय क्रूर अशा हत्याकांडाचा झटपट तपास केल्याने त्यावेळी टीम एलसीबी चे कौतुक झाले होते. शिवानीच्या वडील आणि भावावर खुनाचा ठपका ठेवत त्यांना अटक झाली,सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत..दरम्यान आता शिवानी जिवंत असल्याची बाब समोर आली आहे. स्वतः शिवानी तिच्या प्रियकरा सोबत बऱ्हाणपूर पोलिसांसमोर हजर झाली.. मी जिवंत आहे, माझ्या वडील आणि भावाला चुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले.. प्राप्त माहितीनुसार बऱ्हाणपूर पोलिसांनी शिवानीला सध्या जळगाव जामोद पोलिसांसमोर हजर केले आहे.. शिवानी जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर टीम एलसीबी सह जळगाव जामोद पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
दरम्यान या वृत्तासंदर्भात "बुलडाणा लाइव्ह"ने एसपी निलेश तांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी खुनाची कबुली दिली होती असेही श्री.तांबे म्हणाले.. यासंदर्भात सविस्तर पूर्ण तपास झाल्यानंतरच बोलता येईल असेही ते म्हणाले..
दरम्यान शिवानीच्या चुलत्याने बुलढणा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. एक दिवस बुलढाणा पोलीस आमच्या घरी आले, तुम्ही तुमच्या मुलीचा खून केला आहे असा आरोप करीत माझ्या भावाला आणि पुतण्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांना खूप मारहाण करून त्यांच्याकडून गुन्हा कबूल करून घेतला. माझा भाऊ आणि पुतण्या निर्दोष असून जिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली ती माझी पुतणी जिवंत आहे असे शिवानीचे काका नारायण कळमेकर म्हणाले...
टीम LCB च्या तपासावर प्रश्नचिन्ह?
दरम्यान या घटने प्रकरणी आता बुलढाणा "एलसीबी"वर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कुठल्या पुराव्यांच्या आधारे शिवानीच्या वडिलांनी भावाला अटक केली? शिवानी जर जिवंत असेल तर तो मृतदेह कुणाचा? खरे खुनी कोण? निर्दोष पिता पुत्रांना अटक केल्याबद्दल टीम एलसीबीच्या तपास पथकावर एसपी निलेश तांबे कारवाई करतील का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.