BIG BREAKING एलसीबीने कोलवडजवळ पकडला मांस भरलेला ट्रक; ट्रकमध्ये १५ क्विंटल मांस! हिंदुत्ववादी संघटनांना गोमांस असल्याचा संशय...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहराला लागून असलेल्या कोलवड मध्ये एलसीबी ने मांस भरलेला ट्रक पकडला आहे. आज ,सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
ट्रकमध्ये दीड टन म्हणजेच १५ क्विंटल मांस असल्याचे सांगण्यात येत आहे. एलसीबी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. हिंदुत्ववादी संघटनांना या प्रकाराची कुणकुण लागली होती, त्यामुळे धाड बुलडाणा रस्त्यावरील कोलवड गावाजवळ मोठा जमाव झाला होता.
सध्या मांस भरलेला हा ट्रक शहर पोलिस ठाण्यात आणलेला आहे. या ट्रक मध्ये गोमांस असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. मांस नेमके कशाचे हे ओळखण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मासांचे नुमुने तपासणीसाठी नेले आहेत. हा ट्रक  मोताळ्याकडून आला होता. मांस सिल्लोड येथे नेण्यात येत असल्याचे समजते. वृत्त लीहिस्तोवर पुढील कारवाई सुरू होती.