BIG BREAKING बुलडाणा "लाइव्ह"चा दणका! जिल्हा परिषदेतील "त्या" दोन टेबल– चिटक्या कलेक्ट–करांची बदली होणार! सामान्य प्रशासन विभागातून सूत्रे हलली....
Sep 16, 2025, 18:20 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कोण म्हणतं लेखणीत ताकद नाही? सत्यासाठी आणि प्रामाणिक कामासाठी लेखणी झटत असेल तर त्याचा इम्पॅक्ट होतोच.."बुलडाणा लाइव्ह" ने आज सकाळीच बुलढाणा जिल्हा परिषदेशी संबंधित एखाद्या विशिष्ट टेबलांवर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यां संबंधित बातमी प्रकाशित केली होती. एका महत्त्वाच्या विभागातील पवार आणि हिवाळे हे कसे कलेक्ट–कर आहेत हे देखील बुलडाणा लाइव्ह ने आपल्या विविध बातम्यातून समोर आणले होते. आज सकाळच्या बातमीत षण्मुखराजन मुख्य कार्यकारी अधिकारी असताना केलेल्या कारवाईचा दाखला देखील बुलडाणा लाइव्ह ने दिला होता..
अखेर आता सूत्रे फिरायला सुरुवात झाली आहे. या दोन्ही साहेबांसाठी संकलन करणाऱ्या या दोन्ही कलेक्ट– करांची बदली होणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागातून सुरू झाली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. यावर अंतिम मोहर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात उमटवणार आहेत...
दरम्यान अधिकाऱ्याच्या कलेक्ट करांवर कारवाई होत असल्याची बाब सुखद असली तरी त्यांच्या म्होरक्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. राज्याच्या मंत्रालयीन सूत्रांकडून तसे संकेत मिळत आहेत...
त्या अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी झापले...
दरम्यान आज,१६ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेतील पदभरती संदर्भात बैठक झाली. जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत सध्या चर्चेत असलेला तो अधिकारी देखील सहभागी होता. बुलडाणा लाइव्ह मध्ये प्रकाशित होत असलेल्या बातम्यांचा दाखला देत जिल्हाधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्याची कानउघाडणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर माझा व्यक्तिगत विषय असल्याचे अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.. मात्र आपण जबाबदार पदावर आहोत, कसला व्यक्तिगत विषय? असे म्हणत जिल्हाधिकारी डॉ.पाटील त्या अधिकाऱ्याला चांगलेच झापले...