BIG BREAKING : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या CEO पदावर मोठा बदल! गुलाबराव खरात यांची बदली; त्यांच्या जागी भालचंद्र चव्हाण यांची नियुक्ती

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मोठा प्रशासकीय बदल झाला आहे. गुलाबराव खरात यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी भालचंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

गुलाबराव खरात हे बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळत होते. आता त्यांच्या बदलीनंतर या पदाची जबाबदारी भालचंद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.या संदर्भातील शासनाच्या पत्रावर सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांची स्वाक्षरी आहे. आदेशानुसार, खरात यांनी सध्याच्या पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार तातडीने स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.