"भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरीली कोटी कुळे"! जिल्हाभरात भीमजयंतीचा माहौल! बुलडाण्यातील मिरवणूक ठरणार आकर्षण
Apr 14, 2023, 12:06 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आज संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जिल्हाभरात आज भिमजयंतीचा माहौल दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासूनच जिल्हाभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आज, सायंकाळी निघणाऱ्या मिवरणुकीने भिमजयंती महोत्सवाचा समारोप होणार आहे. १३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ ला जिल्ह्यात विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात सार्वजनिक भीमजयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेबांचा पाळणा गाऊन भीमजन्मोत्सव साजरा करण्यात आला. राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. दुपारी ३ नंतर बुलडाणा शहरातून भव्य मिरवणूक निघणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाची ही मिरवणूक आकर्षक करण्याचा भिमजयंती सार्वजनिक उत्सव समितीचा मानस आहे. बुलडाणा शहरासह जिल्हाभरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.