भक्तीमहामार्ग रद्द..! चिखलीत महामार्ग विरोधी कृती समितीचा जल्लोष; फटाके फोडले, पेढे वाटले...

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या मोठ्या विरोधानंतर राज्य सरकारने अखेर भक्ती महामार्ग रद्द केल्याची घोषणा केली. शासनाच्या या निर्णयाचा जल्लोष चिखलीत करण्यात आला. भक्ती महामार्ग विरोधी कृती समितीच्या लढ्याला यश आल्याची भावना यावेळी विनायक सरनाईक, डॉ.ज्योती, शेतकरी नेते दासा पाटील, सभापती सत्येंद्र भुसारी खेडेकर यांनी व्यक्त केली..

चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ महामार्ग विरोधी कृती समितीने फटाके फोडून,पेढे वाटून जल्लोष केला. महामार्ग विरोधी कृती समितीने महामार्ग रद्द व्हावा यासाठी वेळोवेळी आंदोलने केली होती. टॉवर वर चढून आंदोलन , रास्तारोको, नदीपात्रात जलसमाधी आंदोलन, उपोषण , थाळी बजाव आंदोलन या आंदोलनांची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. भक्ती महामार्ग रद्द बाबा यासाठी वेळोवेळी आंदोलन करणाऱ्या तसेच शासन दरबारी पत्रव्यवहार करणाऱ्यांचे यावेळी महामार्ग विरोधी कृती समितीने आभार व्यक्त केले..