बुलढाणा शहरासह जिल्हाभरात हाेणार बाप्पांची स्थापना; 
जिल्ह्यात १३८५ सार्वजनिक तर ३०७ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’!

 
 बुलढाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ): शहरासह जिल्ह्यात २७ ऑगस्ट राेजी गणरायांची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बाप्पांच्या आगमणासाठी भाविक सज्ज झाले असून सार्वजनिक मंडळांनी बाप्पाची मूर्ती खरेदी केली आहे. बुलढाणा शहरासह जिल्ह्यात १ हजार ३८५ सार्वजनिक बाप्पांची स्थापना करण्यात येणार आहे. 
यामध्ये शहरी भागात ४७० तर ग्रामीण भागात ९२५ मंडळांचा समावेश आहे. तसेच ३०७ गावांमध्ये एक गाव एक गणपती बसवून सामाजिक ऐक्य व सलाेखा जपण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे गावांमध्ये सामाजिक ऐक्य वाढण्यास मदत होईल. प्रशासनाच्या पुढाकारामुळे ही संकल्पना यशस्वीपणे रुजत असून अनेक गावांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
गणेश मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम 
बुलढाणा शहरासह ग्रामीण भागात सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. यामध्ये भजन, कीर्तन, पारंपरिक खेळ, स्पर्धा, व्याख्याने, आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांचा समावेश असतो. या कार्यक्रमांमुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा वाढतो, नव्या पिढीला संस्कृतीची ओळख होते.