अल मदिना फाउंडेशनचे बुलडाणा नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन! नदीम शेख यांच्या नेतृत्वात तरुणांनी वाचला समस्यांचा पाढा; मुख्याधिकारी पांडेंनी दिला शब्द...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अल मदिना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांच्या नेतृत्वात आज बुलडाणा नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन चांगलेच गाजले. बुलढाणा शहरातील मिर्झा नगरात उर्दू शाळेत नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दोन- तीन वर्षापूर्वी व्यायाम शाळा बांधण्यात आली होती. मात्र या व्यायाम शाळेत जाण्यासाठी रस्त्यात नसल्याने तरुणांना भिंतीवरून उडी मारून जावे लागत आहे. त्यामुळे व्यायाम शाळेत जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता करून देण्यात यावा अशी मागणी नदीम शेख यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने वेळेवर दखलना घेतल्याने अल मदिना फाउंडेशनच्या वतीने आज ठिय्या मांडण्यात आला. यावेळी नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.अखेर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून आंदोलकांची नगरपरिषद प्रशासनासोबत चर्चा घडवून आणली. आपल्या समस्या शक्य तितक्या लवकर व तातडीने सोडवण्यात येईल असा शब्द दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले...
जाहिरात 👆
बुलढाणा शहरातील मिर्झा नगर येथे उर्दू शाळा क्रमांक २ मध्ये नगरपरिषदेने व्यायाम शाळा बांधली होती. मात्र व्यायाम शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने तरुणांना भिंतीवरून उडी मारून जावे लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र रस्ता करून देण्यात यावा या मागणीसाठी अल मदिना फाउंडेशनने २७ नोव्हेंबरला तशा आशयाचे निवेदनही नगरपरिषद प्रशासनाला दिले होते. मात्र नगरपरिषद प्रशासनाने यावर कोणतीही दखल न घेतल्याने आज नदीम शेख यांच्या नेतृत्वात युवकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी परिसरातील इतर समस्यांबद्दलही नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. बंद पडलेल्या कमेल्यामधील डुकरांचा बंदोबस्त करावा , कमेला परिसरात दररोज घंटागाडी पाठवावी या मागण्याही प्रशासनाकडे करण्यात आल्या. अखेर या समस्या तात्काळ मार्गी लावण्याचा शब्द मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले...