केसगळती नंतर आता बुलढाण्यावर नव्या आजाराचे संकट..! पहिला रुग्ण आढळला; डेंजर आहे "हा" आजार! चालताही येत नाही, गिळताही येत नाही....
राज्यात अनेक ठिकाणी जीबीएस चे रुग्ण आढळले आले आहेत. विशेषत: अलीकडच्या काही दिवसांत पुण्यासारख्या महानगरात या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. आता बुलढाण्यात आठ वर्षीय बालकाला या आजाराची लागण झाली आहे. जीबीएस अर्थात "गुलियन बॅरी सिंड्रोम" हा दुर्मिळ आजार असून ४ लाखांत एखादा हा रुग्ण सापडतो. या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या देखील लक्षनीय आहे. शेजारच्या अकोला आणि अमरावतीत देखील या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बु गावात साडेआठ वर्षाचा बालकाला जीबीएस आजाराची लागण झाली आहे. त्या बालकाला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले असून अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवर जीबीएस आजाराची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार हा आजार ३० ते ५० वयोगटातील नागरिकांना अधिक होतो. मात्र कधी कधी बालकांना सुद्धा हा आजार झाल्याची उदाहरणे आहेत. जगभरात दरवर्षी १ लाख लोकांना हा आजार होतो. हा आजार रुग्णाच्या नसांवर हल्ला करतो, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात. हातापायात मुंग्या येतात. स्नायू कमकुवत झाल्याने चालणे देखील कठीण होते. पाठीत किंवा पायात तीव्र वेदना होऊ शकतात. याशिवाय तीव्र स्वरूपाच्या लक्षणांमध्ये अर्धांग वायूची लक्षणे समाविष्ट आहेत. छातीच्या स्नायूंमध्ये कमकुवत आल्यामुळे श्वास घेणे कठीण होते. बोलण्यात आणि गिळण्यात समस्या निर्माण होते. या आजाराची वरील लक्षणे काही तासात, काही दिवसांत वाढू शकतात.