शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात इंधन पुरवठा करा - ॲड.जयश्री शेळके यांची मागणी! इंधन तुटवड्यावर तातडीने उपाययोजना करण्याची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी...
सध्या शेती मशागती व पेरणीचा महत्त्वाचा हंगाम सुरू असताना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, जनरेटर, पंप तसेच शेतीमाल वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज भासत आहे. प्रत्येक वेळी पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर घेऊन जाणे शक्य नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना कॅनमधून डिझेल वाहतूक करण्याची परवानगी मिळणे गरजेचे आहे. मात्र तसा कोणत्याही प्रकारचा शासकीय आदेश नसल्याने पेट्रोल पंपधारक कॅनमधून डिझेल देण्यास टाळाटाळ करतात. तसेच अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा अपुरा पडत असल्याने शेतकऱ्यांची शेतीकामे खोळंबत असून वेळेवर पेरणी न झाल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आधीच वाढती महागाई, खत-बियाण्यांचे वाढलेले दर आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना इंधन तुटवड्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. तसेच काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार व साठेबाजी होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून समोर येत आहेत.
याशिवाय रोजंदारी कामगार, छोटे व्यापारी, मालवाहतूक व्यवसाय आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा सुरळीत पुरवठा करावा, ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर विशेष नियंत्रण ठेवावे, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच शेतीकामांसाठी आवश्यक इंधनाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी ॲड. जयश्री शेळके यांनी शासनाकडे केली आहे.
सदर प्रश्न हा केवळ इंधनपुरवठ्यापुरता मर्यादित नसून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहाशी संबंधित गंभीर विषय असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख नंदुभाऊ कऱ्हाडे, जिल्हा संघटक सुमीतभाऊ सरदार,बुलडाणा तालुकाप्रमुख विजयभाऊ इतवारे, मोताळा तालुकाप्रमुख विजयभाऊ इंगळे,युवासेना तालुकाप्रमुख मोहितभाऊ राजपूत,युवासेना शहरप्रमुख अनिकेतभाऊ गवळी,कामगारसेना उपतालुका प्रमुख शेख रफिकभाई,शाखा प्रमुख अशोकभाऊ मोहिते, निर्मलभाऊ इंगळे, मो.मुजफ्फरभाई, श्रीकांतभाऊ जाधव, अमोलभाऊ बेंडे, नारायणभाऊ वाणी, अक्षयभाऊ जवरे, बबलुभाऊ इंगळे, सुनंदाताई खरात, अनिताताई जाधव, वर्षाताई खरात, अनिताताई गायकवाड, सुनिताताई सुरडकर, बेबीताई परिहार, स्वातीताई लोंडेकर, भारतीताई भारंबे, रोशनीताई गडर, पल्लवीताई शेळके, मनीषाताई इंगळे, सुरेखाताई कदम, सविताताई राऊत, शारदाताई दाभाडे, रुपालीताई चव्हाण, वैशालीताई मिसाळ, भारतीताई डागोर यांची उपस्थिती होती.