बुलडाण्यात सायंकाळी निळ्या सागराची मानवंदना! भव्य रॅली राहणार आकर्षण; पोलिसांचा तगडा बंदोबस्त; "सीसीटीव्ही" आणि ड्रोन कॅमेरा ची राहणार नजर...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशभरात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठा उत्साहात साजरी करण्यात येत आहे. बुलढाणा शहरात देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमांची रेलचेल आहे. आज सायंकाळी बुलढाणा शहरात भव्य रॅली निघणार आहे, ही रॅली या जयंती उत्सवाचे प्रमुख आकर्षण राहणार आहे.. या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर पोलिसांकडून तगड्या पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे..
   बुलढाणा शहरात ९ पोलीस अधिकारी, १०० पोलीस कर्मचारी, ६० होमगार्ड आणि १ आरसीपी पथक तैनात करण्यात आले असून, शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दिली. भीमजयंती उत्सवात 
 कोणताही अनुशासनभंग अथवा गोंधळ झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही ठाणेदार ठाकरे यांनी दिला आहे..