बुलडाण्यात उद्या भव्य महिला बचतगट प्रदर्शनी ! चित्रपट दिग्दर्शक नीलेश जळमकर यांच्या हस्ते होणार कार्यक्रमाचे उदघाटन;

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जयश्रीताई शेळके यांचे आवाहन..
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने उद्या ४ व ५ नोव्हेंबर रोजी महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. बुलडाण्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालयासमोरील प्रांगणात सकाळी ११ वाजता सत्यशोधक चित्रपटाचे दिग्दर्शक नीलेश जळमकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी केले आहे.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेशराव पाटील राहणार आहेत. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, आ. राजेश ऐकडे, आ. धीरज लिंगाडे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय अंभोरे, संजय राठोड, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुखत्यारसिंग राजपूत, लक्ष्मणराव घुमरे, अरविंद कोलते, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. स्वातीताई वाकेकर, रामविजय बुरुंगले, हाजी दादू सेठ, धनंजय देशमुख, खामगाव विधानसभा पक्षनेते ज्ञानेश्वर पाटील, मेहकर विधानसभा पक्षनेते ऍड. अनंतराव वानखेडे, माजी जि. प. अध्यक्षा मनीषाताई पवार, माजी सभापती ज्योतीताई पडघान, मोताळा नगराध्यक्षा माधुरीताई देशमुख, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस मनोज कायंदे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष ऍड. हरीश रावळ, लोणारच्या नगराध्यक्षा पुनमताई पाटोळे, मेहकरचे माजी नगराध्यक्ष कासम गवळी, माजी सभापती दिलीप जाधव, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष हाजी रशीदखा जमादार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तेजराव मारोडे, माजी जि. प. सदस्य राजेश मापारी, काँग्रेस नेते रमेश घोलप, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस निसार चौधरी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रा. सुनील सपकाळ, जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रसिद्धी प्रमुख महेंद्र बोर्डे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंगलाताई पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन खरात यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर माजी जि. प. सदस्य संतोषराव पाटील, गोदावरीताई धमक, साधनाताई जाधव, हिना सौदागर, उज्वलाताई राजपूत, जयश्रीताई खाकरे, मीनाक्षीताई हागे, महेंद्र गवई, माजी प. स. सभापती तस्लिमाबी रसूल खान, उषाताई चाटे, पुष्पाताई चव्हाण, संगिताताई पांढरे, उज्वलाताई चोपडे, कैलास गवई, प्रकाश बस्सी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
१३० स्टॉल असणार उपलब्ध
बुलडाणा येथे आयोजित दोन दिवसीय बचतगट प्रदर्शनीत जवळपास १३० स्टॉल लावण्यात येणार आहेत. खाद्यजत्रा, हस्तकला वस्तू हस्तशिल्प, घरगुती पदार्थ व मसाले, महिला गृहउद्योग उत्पादित वस्तू, महिलांचा स्नेहमिलन सोहळा, महिलांचा आनंदोत्सव, महिला उद्योजकांचा गौरव समारंभ असे या प्रदर्शनीचे वैशिष्ट्ये आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्यादृष्टीने ही बचटगट प्रदर्शनी महत्वाचे पाऊल ठरणार आहे. 
शिवशाहीर कांबळेंचा शाहिरी जलसा ठरणार आकर्षण
बचतगट प्रदर्शनीत दोन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. प्रसिद्ध शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा प्रबोधनात्मक शाहिरीचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. आपल्या पहाडी आवाजात ते शाहिरी जलसा सादर करणार आहेत. महामानवांच्या शौर्यगाथा ते आपल्या पोवाड्यातून सादर करतील. यासोबतच इतरही कार्यक्रम यादरम्यान आयोजित करण्यात आले आहेत.
कोण आहेत नीलेश जळमकर?
नीलेश जळमकर हे लेखक, दिग्दर्शक आहेत. त्यांचे पाच मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा त्यांचा चित्रपट पाच जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यांना जर्मनी येथील फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे.