पशुधन दाव्यापोटी ५५ हजारांचा धनादेश वितरित! राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या माध्यमातून पशुपालकास दिलासा...

 
 अंढेरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या माध्यमातून व युनायटेड इंडिया इंशोरन्स कंपनीकडून येथील शेतकऱ्यास पशुधनाच्या दाव्यापोटी ५५ हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. त्यामुळे पशुपालकास मोठा दिलासा मिळाला आहे. 

राजर्षी शाहू मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके, सरव्यवस्थाक दिलीप चव्हाण यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या अंढेरा शाखेकडून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी कर्ज वाटप करण्यात आले होते. दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांपैकी अंढेरा येथील वामन दांडगे यांची गाय आजाराने दगावली. त्यांच्या जनावरांचा युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढलेला होता.
परिणामी त्यांच्या जनावरांच्या दाव्याची रक्क्म राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या माध्यमातुन युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीडून देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यास मदत मिळाली आहे. संस्थाध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार मेहकर विभागाचे विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले यांच्या हस्ते वामन दांडगे यांना धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी गजानन तेजनकर, समाधान तेजनकर, ज्ञानेश्वर दांडगे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.