शॉक लागून ४० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; अंत्री खेडेकर येथील घटना..!

 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विद्युत शॉक लागून अंत्री खेडेकर येथील ४० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल १९ मे रोजी अंत्री खेडेकर येथे दुपारी घडली. विनोद भास्कराव खेडेकर असे मूृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
अंत्री खेडेकर येथील रहिवाशी असलेले विनोद भास्कराव खेडेकर हे आपल्या शेतातील विहिरीला पाणी कमी असल्याने विहिरीचे खोलीकरण करणाचे काम सुरू केले होते. सकाळच्या वेळेत विद्युत पुरवठा विस्कळीत होवू लागल्याने ते शेतात गेले त्यांचा वीज तारेला धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती वीज वितरण विभागाचे अभियंता आदित्य पडघान आणि ठाणेदार रुपेश शक्करगे यांना देण्यात आली.

हेही वाचा...

माहिती मिळताच लगेच घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचासमक्ष पंचनामा केला असता अशोक बाजीराव खेडेकर यांच्या शेतातील गट नंबर ६१/६२ मध्ये विद्युत पोलवर जवळ विनोद खेडेकर यांना शॉक लागून मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने गावकरी हळहळ व्यक्त करीत आहे.