आदिवासी कोळी महादेव समाजाची बुलडाण्यात जोरदार निदर्शने! जात प्रमाणपत्रांची पूर्तता करा, अन्यथा आंदोलन!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील आदिवासी कोळी महादेव समाजाला जात प्रमाणपत्र मिळावे,या मागणीपूर्तीसाठी आज ३० डिसेंबरला जिल्हा कार्यालयावर आदिवासी कोळी महादेव समाजबांधवांनी जोरदार निदर्शने केली. दरम्यान जिल्हा यंत्रणेला मागणीचे निवेदन देण्यात आले.

 राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी कोळी महादेव समाज आहे. त्यांना जात प्रमाणपत्र मिळत नाही, जात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याकडे फाईल घेऊन गेल्यावर ती फाईल अधिकारी स्वीकारत नाही.कोळी महादेव जमातीचे जातीचे आधारावर प्रमाणपत्र देण्याचे नाकारतात. त्यांचा प्रास्तावच  स्विकारत नाही.तर स्विकारलेल्या प्रस्तावावर सुनावणी न लावता प्रलंबीत ठेवतात.

त्यामुळे या आदिवासी कोळी महादेव जमाती मधील शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी गीते यांना देण्यात आले. दरम्यान प्रस्तावना करणाऱ्या एसडीओ यांचा पदभार काढावा, त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल वरिष्ठांनी कारवाई करावी अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेऊ असा इशारा देखील देण्यात आला आहे.