माहिती अधिकार कायद्याचे अस्तित्व कागदावरचं! मेहकर तालुक्यातील भोसा ग्रामपंचायतीचा कारभार तर पहा..
खामगाव येथील विनोद भोकरे यांनी भोसा ग्रामपंचायतीचे जनमाहिती अधिकाऱ्यांना २२ मार्च रोजी माहिती अधिकारात ग्रामपंचायतला ५ वर्षामध्ये मिळालेला निधी, निधीचा वापर, लाभार्थ्यांना दिलेले घरकुल, बाकी असलेले घरकुल, किती शौचालयाचे बांधकाम झाले? याशिवाय रस्ते, नाली बांधकामासाठी खर्च कसा करण्यात आला?
याबाबत माहिती मांगीतली होती. माहितीच्या अनुषंगाने भोसा ग्रामपंचायत सचिव पुरुषोत्तम गवई व सरपंच गुंफाबाई विठ्ठल शिंदे यांनी विनोद भोकरे यांच्याशी ८ एप्रिल रोजी पत्रव्यवहार केला होता. अर्जदारांना माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बोलावले होते. अर्जदार आज, २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता माहिती घेण्यासाठी भोसा ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. त्यावेळी सचिव गवई ग्रामपंचायत कार्यालयात हजर नव्हते. यावेळी सचिवांना फोन केला असता त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विनोद भोकरे यांनी मेहकरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.