जिजाऊ जयंतीदिनी होणार किसान ड्रोनचे लॉंचिंग ! अभिता लँड सोल्युशन & अभिता इन्फ्राटेकचे उपस्थित राहण्याचे आवाहन !
 

 
सिंदखेड राजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अभिता लँड सोल्युशन आणि अभिता यूएव्ही इन्फ्राटेकच्यावतीने १२ जानेवारी रोजी किसान ड्रोनचे लॉंचिंग करण्यात येणार आहे. मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यादरम्यान हे लॉंचिंग होणार आहे, अशी माहिती अभिता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके यांनी दिली.

आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. देशातील जवळपास ७० टक्के जनता शेती करते. मात्र आजही मोठ्या प्रमाणात शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. पिकाला खत देणे, कीटकनाशक फवारणी यासह इतर कामे पारंपरिक पद्धतीने केली जातात. यामध्ये नुकसान होत असून तांत्रिक शेती काळाची गरज आहे. जुन्या पद्धतीने खत शिंपडतांना केवळ १५ ते ४० टक्केच खत पिकाला मिळते. तर ड्रोनद्वारे पाणी शिंपडलेल्या खत देण्याच्या पद्धतीने ९० टक्के खत पिकाला मिळते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.

ड्रोनच्या माध्यमातून शेतकरी एका एकरात अवघ्या सात मिनिटांत कीटकनाशके, पाण्यात विरघळणारी खते आणि पोषक तत्वांची फवारणी करु शकतात. यामुळे वेळ आणि  खर्चाची बचत होईल. तसेच फवारणी करणाऱ्या व्यक्तीला विषारी रसायनांपासून त्रास होणार नाही. त्याला सुरक्षितता मिळेल. 

किसान ड्रोन शेतीला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांनी याकडे सकारात्मकदृष्टीने बघितले पाहिजे. १२ जानेवारी रोजी किसान ड्रोन लाँचिंग कार्यक्रमात याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रोजेक्ट मॅनेजर विशाल बुरसे यांनी केले आहे.

किसान ड्रोनची वैशिष्ट्ये

किसान ड्रोनचे अनेक फायदे आहेत. यामुळे युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. शेती फवारणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. १० ते २० लीटर कीटकनाशके फवारता येतात. एकावेळी २ ते ५ एकर शेतीत केवळ १५ ते २० मिनिटात फवारणी करता येते. भारत सरकार मान्यता प्राप्त आहे. ड्रोन खरेदीसाठी बँकेकडून अर्थससहाय्य मिळते.