काळंकृत्य!... चिखलीच्या कोटक महिंद्रा बँकेत वाचा त्यांनी काय केलं...
Apr 22, 2022, 18:28 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीच्या कोटक महिंद्रा बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना काल, २१ एप्रिलला सकाळी समोर आली. चोरट्यांनी बँकेबाहेरील व एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळा रंग फवारला. त्यांचं हे काळकृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमध्ये दिसून अालं असून, बँक व्यवस्थापकांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.
व्यवस्थापक शशिकांत नंदलाल गोहेल यांनी तक्रारीत म्हटले आहे, की २१ एप्रिलला सकाळी ९ च्या सुमारास ते बँक उघडण्यास आले असता बँकेबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळा रंग फवारल्याचे दिसून आले. बँक उघडून सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता ही घटना पहाटे चारच्या सुमारास घडल्याचे दिसून आले. चोरट्यांनी काळा रंग फवारून बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.