थोड्याच वेळात होणार एल्गार मोर्चाला सुरुवात! बुलडाण्यात आज जिल्हाभरातील शेतकऱ्यांची चिक्कार गर्दी; पोलिसांनी बोलावली अतिरिक्त कुमक; सभास्थळी ४ एलईडी स्क्रीन; रांगोळीने साकारले तुपकर.! बातमीत पहा फोटो

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आज, ६ नोव्हेंबरला दुपारी भव्य एल्गार मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने शेतकरी बुलडाण्यात दाखल होत आहे.  या मोर्चाला चिक्कार गर्दी जमणार आहे. बुलडाण्यात आज अभूतपूर्व जनसागर उसळणार असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.दरम्यान या मोर्चाला सर्वच स्थरांतून पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनीही या मोर्चाला समर्थन दिले आहे.

 पक्षाच्या झेंड्यांना बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकत्र येण्याचे आवाहन तुपकरांनी केले होते. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोयाबीन आणि कापसाच्या भाववाढीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुलडाणा शहरातील त्रिशरण चौक ते जयस्थंभ चौक या मार्गावरील वाहतूक सुद्धा सर्क्युलर रोड मार्गाने वळविण्यात आली आहे. दरम्यान बुलडाणा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाला रविकांत तुपकर संबोधित करणार आहे.  सभास्थळी ४ एलइडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. सभास्थळी निताताई  साळवे यांनी काढलेली तुपकरांची रांगोळी लक्ष वेधून घेत आहे.