प्रमुख जिल्हा न्यायालयात पार पडले दंत तपासणी- चिकित्सा शिबिर,
जिल्हा वकील संघाचा पुढाकार
Aug 6, 2022, 16:09 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात मोफत दंत रोग तपासणी व चिकित्सा शिबिर उत्साहात पार पडले. यावेळी वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
बुलडाणा वकील संघाचे अध्यक्ष ऍड विजय हिम्मतराव सावळे यांच्या संकल्पनेतून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सभागृहात आज 6 ऑगस्टला सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान हे शिबिर पार पडले. यावेळी कमीअधिक दीडशे वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.प्रारंभी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे अनौपचारिक उदघाटन करण्यात आले.
प्रास्ताविक अध्यक्ष विजय सावळे यांनी केले. यावेळी न्यायाधिश आर एन मेहरे, श्री साने, सुपेकर, श्रीमती गायकवाड, श्रीमती भोसले, श्री भुरे, प्रबंचक भारंबे यांचेसह न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी, सदस्य प्राधिकरण चे अधीक्षक चाकोतकर व कर्मचारी हजर होते. आभार सचिव अमर इंगळे यांनी मानले.