BIG BREKING जिल्हा पोलिस दलात नवीन गडी नवा राज! जिल्ह्यातल्या ४२ पोलीस अधिकाऱ्यांची बदली; साखरखेर्डा आणि बिबी पोलीस ठाण्याला मिळाले नवीन ठाणेदार; वाचा कुणाची बदली कुठे...
जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी ३ जानेवारीला झालेल्या जिल्हा अस्थापना बैठकीत हा निर्णय घेऊन तात्पुरत्या स्वरूपात पदस्थापना दिली. प्रशासकीय कारणास्तव जवळपास ४२ जणांची ही बदली करण्यात आली आहे.
या संदर्भात बुलडाणा लाइव्हने धांडोळा घेतला.
नंदकिशोर काळे साखरखेर्डाचे कारभारी, जितेंद्र आडोळे आता बुल डाण्यात..
दरम्यान आज करण्यात आलेल्या बदल्यात १७ सहाय्यक पोलीस निरीक्षक ( एपीआय) दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यात आतापर्यंत जिल्हा पोलिस अधीक्षकांचे वाचक म्हणून कारभार सांभाळणारे सपोनि नंदकिशोर काळे यांची साखरखेर्डाचे ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली. आतापर्यंत साखरखेर्डाचे ठाणेदार म्हणून काम सांभाळणारे जितेंद्र आडोळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात वाचक शाखेचा कारभार सांभाळतील. बिबी पोलीस ठाण्याला बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात छाप सोडणारे सदानंद सोनकांबळे यांच्या रूपाने नवे ठाणेदार मिळाले आहेत. आतापर्यंत बिबी चे ठाणेदार म्हणून काम पाहणारे सपोनि लहू तावरे यांची मलकापूर शहर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
या सहाय्यक पोलिस निरीक्षकांची झाली बदली..!
सपोनि स्मिता म्हसाये सध्या (मलकापूर पोलीस ठाणे) आता (नांदुरा पोलीस ठाणे), प्रवीण मानकर सध्या (नांदुरा पोलीस ठाणे) आता (मुदतवाढ), कमलेश खंडारे सध्या (शेगाव शहर ठाणे) आता (आर्थिक गुन्हे शाखा बुलडाणा), लहू तावरे सध्या ( बीबी पोलीस ठाणे) आता (मलकापूर पोलीस ठाणे), अभिजीत अहिराव सध्या (शहर पोलीस स्टेशन बुलडाणा) आता (पुढील बदली पर्यंत मुदत वाढ) जितेंद्र आडोळे सध्या (ठाणेदार साखरखेर्डा ) आता (वाचक पोलीस अधीक्षक बुलडाणा कार्यालय), सुनील सोळंके सध्या (आर्थिक शाखा बुलडाणा) आता (बुलडाणा सायबर शाखा), द्वारकानाथ गोंदके सध्या (खामगाव पोलीस स्टेशन ग्रामीण) सध्या (पोलीस स्टेशन खामगाव शिवाजीनगर), रवींद्र लांडे सध्या (शिवाजीनगर खामगाव पोलीस स्टेशन) आता (पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण), अशोक जायभाये सध्या (आर्थिक गुन्हे शाखा बुलडाणा) आता मेहकर पोलीस ठाणे), वंदना विरणक सध्या (पोलीस ठाणे नांदुरा) आता (नियंत्रण कक्ष बुलडाणा), दुर्गेश राजपूत सध्या (पोलीस ठाणे सायबर बुलडाणा) आता (पोलीस ठाणे ग्रामीण बुलडाणा), सदानंद सोनकांबळे सध्या (बुलडाणा ग्रामीण) आता ( ठाणेदार बिबी पोलीस स्टेशन), ब्रिज पालन सिंह ठाकुर सध्या (जीवनीशा बुलडाणा) आता ( मलकापूर नियंत्रण कक्ष), नंदकिशोर काळे सध्या (वाचक पोलीस अधीक्षक कार्यालय बुलडाणा) आता (साखरखेर्डा पोलीस स्टेशन), सविता मोरे सध्या (महिला व बाल अत्याचार बुलडाणा) आता (एफ आर ओ जिल्हा विशेष शाखा बुलडाणा), नंदकुमार आयरे सध्या (मेहकर पोलीस ठाणे) आता (अर्ज शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय बुलडाणा)
या पोलिस उपनिरीक्षकांची झाली बदली..!
पोलीस उपनिरीक्षक नामदेव तायडे (सध्या मलकापूर) आता (नियंत्रण कक्ष बुलडाणा), सचिन चव्हाण (सध्या चिखली) आता (शहर पोलीस स्टेशन बुलडाणा), नितीन इंगोले (सध्या शेगाव) आता (पोलीस स्टेशन नांदुरा), राहुल कातकोडे (सध्या जलंब) आता (शेगाव शहर ठाणे), रीना कोरडे ( सध्या बाल व महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष बुलडाणा) आता (पुढील सर्वसाधारण बदलीपर्यंत मुदत वाढ), ईश्वर सोळंके (सध्या
खामगाव शहर पोलीस ठाणे) आता (मलकापूर शहर), अशोक रोकडे सध्या (बोराखेडी पोलीस ठाणे)( आता ३१ पर्यंत मुदतवाढ), अनिल भुसारी ( सध्या बोराखेडी) आता (जिल्हा विशेष शाखा बुलडाणा),संजय ठाकरे सध्या ( मलकापूर पोलीस ठाणे) आता (महिला व बाल अत्याचार कक्ष बुलडाणा), गजानन मुंडे (सध्या धाड पोलीस ठाणे) आता ( खामगाव पोलीस ठाणे), आशिष गद्रे ( सध्या धामणगाव बढे पोलीस स्टेशन) आता (शेगाव पोलीस स्टेशन), सुरज काळे सध्या (लोणार पोलीस ठाणे) आता (मुदतवाढ), विजय घुले (सध्या मेहकर पोलीस ठाणे) आता (बोराखेडी पोलीस ठाणे), श्रीकांत विखे (सध्या खामगाव पोलीस स्टेशन) आता (मलकापूर), किरण खाडे (सध्या देऊळगाव राजा) आता(पुढील बदलीपर्यंत मुदतवाढ), सिद्धेश्वर उमाळे ( सध्या नांदुरा ) आता (मेहकर पोलीस ठाणे), मुकुंद डबके (सध्या कल्याण शाखा बुलडाणा) आता (वाचक, उपविपोअ अधिकारी बुलडाणा), विश्वजीत ठाकूर सध्या (मलकापूर पोलीस स्टेशन) आता (नियंत्रण कक्ष मलकापूर), श्रीकांत जिंदमवार सध्या (स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा) आता (जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा बुलडाणा), विजय हुडेकर सध्या ( जिल्हा विशेष शाखा, बुलडाणा) आता (जिल्हा वाहतूक शाखा बुलडाणा), स्वप्निल रणखांब सध्या (नियंत्रण कक्ष बुलडाणा) आता ( नांदुरा पोलीस स्टेशन), वसंत पवार सध्या (हिवरखेड पोलीस ठाणे) आता(मेहकर पोलीस स्टेशन), दीपक सोळंके सध्या (सोनाळा )आता (तामगाव पोलीस ठाणे), मोहन गीते सध्या ( देऊळगाव राजा) आता (नियंत्रण कक्ष बुलडाणा), सचिन कानडे सध्या ( साखरखेर्डा) आता (स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा) अशी ही यादी आहे.