आई जगदंबेच्या चरणावर वाहिले २०१ नारळ! आ. संजय गायकवाड यांच्या विजयासाठी निष्ठावंताचा असाही नवस! 

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपल्या नेत्यासाठी कार्यकर्ते स्वतःला वाहून घेतात.. नेत्याच्या विजयासाठी अपार कष्ट घेतात.. यंदा बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची लढतही अत्यंत चुरशीची झाली.. या अटीतटीच्या निवडणुकीत संजय गायकवाड यांनी विजय मिळवला, मिळालेला विजय आमदार गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना समर्पित केला.. आ. गायकवाड यांच्या विजयासाठी अनेक कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, काहींनी नवस कबूल केले..आता विजयानंतर या कार्यकर्त्यांनी कबुल केलेले नवसही फेडले आहेत.. बुलढाणा येथील निष्ठावंत शिवसैनिक संतोष जाधव यांनी संजय गायकवाड यांच्या विजयासाठी २०१ नारळाचा नवस आई जगदंबे कडे कबूल केला होता. आज तो नवस फेडण्यासाठी स्वतः आ. संजय गायकवाड देखील उपस्थित होते..
बुलडाणा शहराचे ग्रामदैवत असलेल्या बुलडाणातील मोठी देवी येथे आज संतोष जाधव यांनी आपला नवस फेडला. निवडणुकीच्या आधी त्यांनी आ. गायकवाड विजय व्हावेत यासाठी २०१ नारळाचा नवस कबूल केला होता. आज आई जगदंबेच्या चरणी २०१ नारळ अर्पित करून हा नवस फेडला. शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते...