चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ येथे आज,२८ फेब्रुवारीला होवु घातलेल्या सभेकरीता संपुर्ण बुलडाणा जिल्हयातुन जवळपास १५० एस.टी. बसेस यवतमाळ ला पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हाभरातुन १५० बसेसच्या नियमीत फेऱ्या रद्द झाल्यामुळे एस.टी. बसेसची संख्या कमी होवुन याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. एकीकडे जिल्हयात गारपीट झाल्याने त्रस्त शेतकरी आपल्या नुकसानीची ऑनलाईन नोंद करण्याकरीता तालुका स्तरावर पोहचण्यास हालअपेष्टा सहन करत आहे. तर दुसरीकडे १२ वी च्या परीक्षा सुरू असुन परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी जिल्हाभरात विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. मोदींच्या प्रचारासाठी जनतेच्या तिजोरीवर दरोडा टाकल्या जात असल्याचा घणाघाती आरोप बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी करीत या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
ग्रामीण विकास यंत्रणा यवतमाळच्या जिवन्नोत्ती अभियांना अंतर्गत आयोजित महिला मेळाव्याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. या सभेला जिल्हयातील चिखली येथुन २२ , बुलडाणा २६, खामगांव २१, मेहकर २५, मलकापुर २०, जळगांव जामोद १८, शेगांव १८ अशा एकुन सुमारे १५० बसेसच्या नियमीत बसफेऱ्या रद्द करून यमतमाळ ला सरकारी खर्चावर पाठविण्यात आल्या आहेत. ऐनवेळी प्रत्येक आगारातुन बस फेऱ्या रद्द करून बसेस सरकारी खर्चाने यवतमाळला पाठविण्यात आल्याने जिल्हाभरातील प्रवाशांसह विशेष करून शेतकरी व परीक्षेला जाणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांना नाहक हाल सोचावे लागले आहेत. ऐकीकडे विद्यार्थ्यांची १२ वी ची परीक्षा अनं दुसरीकडे नुकत्याच जिल्हयात झालेल्या गारपिटीची ऑनलाईन नोंद करण्यारकीता तालुका ठिकाणी जाण्यासाठी शेतक-यांची उडालेली धांदल, असे चित्र जिल्हयातील उपरोक्त आगारांमध्ये तसेच जिल्हाभरात पाहवयास मिळाले. महत्वाचे म्हणजे जनतेच्या कर स्वरूपातुन गोळा झालेला शासनाच्या तिजोरीतील पैसा म्हजेच जनतेचा पैसा पैशाचा मोदी सरकारकडुन लोकसभेच्या प्रचारासाठी गैर वापर करण्यात येत असल्याचा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला आहे.
राहुल बोंद्रेंनी साधला प्रवाशांशी संवाद..!
यापूर्वी चिखली आगारात ७५
एस.टी. बसेस होत्या मात्र ती संख्या आता ५० वर येवून ठेपली असुन त्यातील सुस्थितीत असलेल्या २५ एस.टी. बसेस यवतमाळ ला सरकारी कार्यक्रमा करीता पाठविण्यात आल्या आहेत. याचा भुदंड सरकारी तिजोरीवर पडत असुन प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मात्र हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. मोदी सरकारच्या या कृत्याचा बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने तिव्र शब्दात राहुल बोंद्रे यांनी निषेध व्यक्त केला आहे. यावेळी चिखली बसस्थानाकावरील हाल होत असलेल्या असंख्य महिला पुरूष व विद्यार्थ्यांशी स्वतः राहुल बोंद्रे यांनी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी त्यांच्यासोबत कॉग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.