चिखली विधानसभा मतदारसंघात आमदार श्वेताताईंनी आणली विकासगंगा !

आज,तब्बल १५३८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन! केंद्रीय मंत्री रक्षाताई आणि ना.प्रतापराव जाधव राहणार उपस्थित..
 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे. पहिली ३ वर्षे कोरोना आणि विरोधी पक्षात गेली असली तरी अलीकडच्या दोन वर्षाच्या हजारो कोटी रुपयांचा निधी श्वेताताईंनी मतदारसंघात आणला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासाच्या योजनांचा धडाका त्यांनी लावल्या आहेत.आज,११ ऑक्टोबरला चिखली विधानसभा मतदारसंघात तब्बल १५३८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आ. श्वेताताईंच्या संकल्पनेतून होणार आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत...
Bhumi
Advt.👆

 

चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात सकाळी १० वाजता हा सोहळा सुरू होणार आहे. चिखली शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी चिखली नगरपरिषद थ्री व्हॉल्व पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन होणार आहे, या कामासाठी तब्बल १४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चिखली तालुक्यातील पारध- धामणगाव-धाड-सावळी साकेगाव- चिखली या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३११.६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Bhumi
Advt.👆
याशिवाय हॅम अंतर्गत चिखली तालुक्यातील चौथा - गरडा हा प्रमुख जिल्हा मार्ग, दुधा - माळवंडी - केळवद - किन्होळा - धोडप या रस्त्याचे ३८४.५८ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. यासह ३११.६८ कोटी आणि ३९१.७१ कोटी रुपयांच्या आणखी दोन कामांचे भूमिपूजन देखील होणार आहे.